Posts

सात चाळीस, मुम्ब्री, ब्रिज आणि बरंच काही

सात चाळीस, मुम्ब्री, ब्रिज आणि बरंच काही  मुंबईच्या लोकल्स बरेच दिवस बंद होत्या. आता चालू झाल्या आहेत असं ऐकतो. त्यावरून माझ्या लोकल प्रवासाची आठवण झाली.  तसं पाहता कॉलेज मध्ये असताना (VJTI) माटुंग्याला जायला लागायचं. म्हणून लोकल प्रवास होताच. पण तेव्हा एक अशी ठरलेली लोकल, रोजची अशी नव्हती. कारण रोज पहिलं लेक्चर असायचंच असं नाही. आणि शिवाय तेव्हा कॉलेज मधले मित्र बरोबर असायचे. आणि आम्ही फारच सिरिअस (!) विद्यार्थी असल्यामुळे लेक्चर्स बंक करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार होता (आणि "तो मी बजावणारच!") नंतर जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मात्र (निरुपायाने!) रोज सकाळी तीच लोकल पकडायला लागायची. परंतु हे Blessing in disguise होतं हे नंतर कळलं. याचं कारण म्हणजे मुंबईच्या लोकल मध्ये, रोजचे जे लोक असतात ते आपोआप जवळ येतात. अर्थात फिजिकली लोकलच्या गर्दीमुळे जवळ येतातच, पण मनानेही जवळ येतात.  सकाळच्या सात चाळीसच्या लोकल मधले सगळे लोक आता बत्तीस वर्ष झाली तरी पूर्णपणे आठवतात.  आम्ही बहुतेक वेळा (उभ्या उभ्या) ब्रिज किंवा मुम्ब्री खेळायचो. त्यावेळेचे गद्रे, मणेरीकर, पाल्या (श्रीकांत पा...
मंगला काकू  मंगला काकू  आज गेली. त्याबरोबरच त्या पिढीचा शेवटचा दुवा निखळला. माझे  तीन  काका (जयंत काका, शाम काका,  मोठे काका), आणि आत्या. आता सगळे काळाच्या पडद्याआड गेले. अरविंद दादा त्या आधीच गेला. तसं म्हणलं तर काळाच्या पडद्याआड सगळ्यांनाच जायचंय. आज की उद्या हाच प्रश्न.  मंगला काकू ही अतिशय म्हणजे अतिशयच प्रॅक्टिकल होती. मी आणि ताई लहानपणी खूप वेळा अंबरनाथ ला त्यांच्या कडे जायचो. कधी कधी रहायला पण. जयंत काका जत्रेला घेऊन जायचे ते चांगलं आठवतंय. मंगला काकू पहिल्यापासूनच बोलायला एकदम प्रॅक्टिकल आणि सरळ. मागच्या वेळेला भारतात आलो होतो तेव्हा भेट झाली होती. तिच्याकडेपुष्कळ पैसे होते. ती पैशे म्हणायची. मला म्हणाली, मी देऊन टाकले पैशे. आता मला काय करायचेत! आता सुनील बघून घेईल!  आणि एक तिचं वाक्य म्हणजे "आमच्याकडे काही वाघिणी  फुटल्या आहेत का" ? तसं म्हणलं तर मी आणि ताई, आम्ही अर्ध्या पिढीच्या अंतरावर आहोत. सुनील दादा, अरविंद दादा, अनिल दादा हे आमच्या वर अर्धी पिढी आणि शंतनू सुशांत वगैरे आमच्या अर्धी पिढी खाली. त्यामुळे असेल कदाचित पण मंगला काकू आणि ज...

असंही मराठी!

असंही मराठी! मराठीत काही काही शब्द असे आहेत की ते रोजच्या संदर्भात वापरूच शकत नाही. उदाहरणार्थ  विवेक, काय करतोयस? याची खालील उत्तरं वाचा.  काही नाही, जरा प्रसंगावधान राखत बसलोय.  काही नाही, जरा मौज लुटतोय. काही नाही,  जरा रेवडी उडवत बसलोय. काही नाही,  जरा खिल्ली उडवत बसलोय.